राज्यातील मतदारयाद्याच्या विशेष सखोल पुनरावलोकनासाठी (एसआयआर) मतदारांना वितरित केलेले अर्ज गोळा करण्याचे काम कालपासून सुरू झाले आहे. काल संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुमारे 3686 अर्ज गोळा करण्यात आले. राज्यात सुमारे 11 लाख 85 हजार 034 मतदारांना एसआयआर अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांना दिलेले अर्ज परत घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत वितरित केलेल्या अर्जांपैकी 0.31 टक्के अर्ज गोळा केले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.