Home बातम्या ‘माझे घर’ योजना सुटसुटीत, करणाऱ्या अध्यादेशांना मान्यता

‘माझे घर’ योजना सुटसुटीत, करणाऱ्या अध्यादेशांना मान्यता

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारच्या माझे घर योजनेची प्रक्रिया आणखीन सुटसुटीत करण्यासाठीच्या पंचायत आणि नगरविकास खात्याच्या तीन अध्यादेशांना काल मान्यता देण्यात आली
आहे.

बैठकीत पंचायत संचालनालय आणि नगरविकास खाते आणि सीसीपी यांच्या माझे घर योजने संबंधीच्या अध्यादेशांना मान्यता देण्यात आली आहे. या अध्यादेशामुळे माझे घर योजना आणखीन सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. तसेच, बैठकीत आरोग्य खात्यात दोन जागा कंत्राटी पध्दतीवर भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.