Home Featured हणजूण, आसगावात ईडीची छापेमारी

हणजूण, आसगावात ईडीची छापेमारी

0

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल हणजूण व आसगाव येथे चार ठिकाणी छापे मारले. एका बांधकाम व्यावसायिकासह स्थानिक पंच सदस्य व अन्य दोघांच्या घरांवर हे छापे मारण्यात आले.

सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यानी काल सकाळी 6.30 च्या दरम्यान कारवाईला सुरुवात केली होती. ईडीचे अधिकारी पहाटे सुमारे 20 ते 25 वाहनांच्या ताफ्यासह हणजूण व आसगाव येथे आले होते. ईडीने ज्या चौघांच्या घरांवर छापे टाकले, त्यांचा जमीन घोटाळा प्रकरणात हात होता. दरम्यान, आसगाव व हणजूण येथे झालेल्या जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने हे छापे मारले असल्याचे सूत्रानी सांगितले. राज्य सरकारने जमीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर तपासकाम करण्यासाठी गोवा पोलिसांचे विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. या घोटाळ्यासंदर्भात आसगाव व हणजूण कोमुनिदादीनी तक्रारी केलेल्या आहेत. ईडीची ही कारवाई त्या संदर्भात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या छापेमारीनंतर जमीन घोटाळ्यातील आरोपींचे धाबे दणाणले आहेत.