Home बातम्या के. कविता यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

के. कविता यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

0

भारत राष्ट्र समिती पक्षा पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आपली मुलगी व आमदार के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर के. कविता यांनी काल बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. के. चंद्रशेखर राव आणि मुलगी के. कविता यांच्यात सुरू असलेल्या वादाने मंगळवारी कळस गाठला व त्यावेळी राव यांनी आपली कन्या के. कविता यांना पक्षातून निलंबित केले. के. कविता यांनी पक्षातील वरिष्ठ नेते हरिश राव आणि संतोष राव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हरिश राव आणि संतोष राव हे माझे वडील आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांची प्रतिमा मलिन करत असून त्यामागे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा हात असल्याचा आरोप कविता यांनी केला होता.