मुंगुल मडगाव येथील टोळी युद्धप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना पकडले आहे. त्यामुळे आता अटक केलेल्यांची संख्या 23 झाली आहे. काल पकडलेल्यांमध्ये एक संशयित राजस्थान येथील असून तो कुख्यात गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजस्थान येथील ओमसा म्हणजे ओम प्रकाश राम व फोंडा येथील सूरज नाईक बोरकर अशी काल अटक केलेल्यांची नावे आहेत. ओमसा हा राजस्थानातील असून बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. त्याला या टोळी प्रमुखाने गोव्यात बोलावून आणले होते. न्यायालयात दोघांनाही हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. दि. 12 ऑगस्ट रोजी पहाटे टोळीयुद्धात रफिक तशान व युवकेन सिंग बदौला यांच्या कारवर गोळीबार केला होता.