Home Featured बाळ्ळी-केप्यात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

बाळ्ळी-केप्यात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

0

राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण वाढतच चाललेले आहे. काल रविवारी राष्ट्रीय महामार्ग-66वर बाळ्ळीजवळ घायचोमड्डो (केपे) येथे झालेल्या ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बार्शे-केपे येथील कमलेश गावकर (34) हा दुचाकीचालक जागीच ठार झाला. कमलेश गावकर हा दुचाकीचालक बार्शे येथून मडगावच्या दिशेने येत होता तर ट्रक काणकोणच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर झाल्याने कमलेश गावकर हा दुचाकीवरून रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाला व जागीच ठार झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी पंचनामा करून ट्रकचालकाला अटक केली.

पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसला मेरशी येथे आग

दरम्यान, काल दुपारी 2.30च्या दरम्यान पर्यटकांना घेऊन मडगावला जाणाऱ्या एका बसला मेरशी येथे आग लागण्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने या अपघातात जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले
नाहीत.
ही बस म्हापसा येथून मडगावला चालली असता मेरशी येथे पोचल्यावर बसला आग लागली. ही बस पर्यटकांना मडगाव रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी निघाली होती.
बसला आग लागल्याचे चालकाला कळताच त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविले. नंतर त्यांना दुसऱ्या बसमधून मडगावला सोडण्यात आले.