मडगाव नगरपालिका बैठकीत निर्णय
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मडगाव पालिका क्षेत्रातील बेकायदा अतिक्रमणाविरुद्ध कारवाई सुरू केली जाईल असा निर्णय पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची बैठक झाली. पालिकेचे मुख्याधिकारी मालवीय व्हेज, उपनगराध्यक्षा बबिता नाईक व अन्य नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत सर्वेक्षणाबद्दल काही नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असता, सर्वेक्षण झाल्यावर तो अहवाल पालिका मंडळासमोर ठेवण्याची सूचना मंजूर झाली. दि. 6 मार्च रोजी उच्च न्यायालयाने पालिकेला आदेश बजावला होता.
सोनसोडो येथील नियोजित कारस्थानाकडे येथे जाणाऱ्या रस्त्या संबंधीचा विषय चर्चेत आला. यावर पालिकेने आपली कोणतीही हरकत नसल्याचे प्रस्ताव संमत
केला.
पालिका कामगार चंद्रकांत दावणे मृृत पावल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्याना 2 लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मयताच्या कुटुंबियानी न्यायालयात दाद मागितली होती. उशीर केल्याने पालिकेला 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.