अजित पवार गटाला निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यास मुभा

0
6

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनाई करावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 2 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल 24 रोजी फेटाळली. याबाबत न्यायमूर्ती म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू शकतो मात्र त्यांना या निवडणूक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागेल. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार गटानेही नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास न्यायालय स्वत: अवमानाचा खटला चालवेल, असा इशाराही दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 नोव्हेंबरला होणार आहे.