राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघातील सुमारे 12 हजार 416 मतदारांना टपाल मतदानासाठी टपाल मतपत्रिका जारी करण्यात आल्या होत्या. त्यातील 11 हजार 115 मतदारांनी टपाल मतपत्रिकेद्वारे 5 मेपर्यंत मतदान केले. मतपत्रिका देण्यात आलेल्या 1017 मतदारांनी मतदान केले नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काल दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी टपाली मतदानासाठी पहिल्यांदाच 30 एप्रिल ते 3 मेपर्यत मतदानासाठी खास मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. टपाल मतदानासाठी अर्ज करणाऱ्यांना टपाल मतपत्रिका मंजूर केले जात होते. त्यानंतर टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी निश्चित केलेल्या केंद्रात येऊन मतदान करावे लागत होते. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये टपाल मतदान मंजूर होणारे कर्मचारी आपल्या मर्जीनुसार मतदान करून पाठवत होते.
उत्तर गोवा मतदारसंघात एकूण 6812 मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यातील 6124 जणांनी मतदान केले, तर 562 जणांनी मतदान केले नाही. दक्षिण गोवा मतदारसंघात एकूण 5604 मतदारांना टपाल मतदान करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यातील 4991 जणांनी मतदान केले, तर 455 जणांनी मतदान केले नाही.