देशाच्या विविध भागांत शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणात उष्णतेची लाट येणार आहे. दुसऱ्या बाजूला देशाच्या काही भागात शनिवारपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुढील आठवड्यापासून बहुतेक भागात तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल ते जून दरम्यान उन्हाळ्याच्या हंगामात पूर्वोत्तर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील बहुतांश भाग वगळता, देशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त तापमान दिसून येईल. पूर्वोत्तर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे.
4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. 4 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थितीची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून उत्तर पश्चिम, मध्य भारत, आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यापासून, पूर्व आणि पूर्व भारतातील काही भाग आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.