पणजी-हैदराबाद इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी 2657 कोटी मंजूर

0
16

पणजी-हैदराबाद इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी 2657.31 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली.

कर्नाटकमध्ये बागलकोट आणि बेळगावी जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्ग 748 च्या बेळगाव-हुंगुंड-रायचूर विभागाच्या 4-लेनिंगसाठी 2675.31 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. हा उपक्रम पणजी-हैदराबाद ईसी 10 कॉरिडॉरचा अविभाज्य भाग आहे. ईसी 10 पणजीसह प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडते. गोवा राज्य मासेमारी, पर्यटन, कृषी आणि औषध उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. अन्नधान्य, ऊस, कापूस, तंबाखू, तेलबिया आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी बेळगाव प्रसिद्ध आहे. रायचूर भाग तांदूळ, कापूस, भुईमूग आणि डाळींसाठी ओळखले जाते आणि हैदराबाद आयटी फार्म, हेल्थकेअरसाठी ओळखले जाते. तसेच, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणा ही राज्ये विविध स्टार्टअपचे केंद्र म्हणून ओळखली जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.