वारंवार वाहतूक नियमभंग; 20 वाहनचालकांना नोटीस

0
7

वाहतूक खात्याने राज्यात विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणात गुंतलेल्या 20 वाहनचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पणजी वाहतूक विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार वाहतूक खात्याने पहिल्या टप्प्यात वरच्यावर विविध वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 20 वाहनचालकांना नोटीस बजावून त्यांचा परवाना का रद्द करू नये, असे नोटिसीमध्ये नमूद करून उत्तर मागितले आहे.
राज्यात वाढत्या अपघात प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्याला थोडी जाग आली आहे. राज्यात वाहतूक नियमभंगाचे प्रकार वारंवार घडत असून, भरधाव आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होत आहे. दरम्यान, येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने पणजी पोलिसांनी मांडवी पुलावरील अपघात प्रकरणी अटक केलेल्या रेंट अ कारचा चालक अंकित त्रिपाठी याची 10 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत काल रवानगी रवानगी केली.