गुंतवणूक वाढीसाठी नियम सुटसुटीत

0
29

गोव्यात नवीन आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी औद्योगिक वसाहतींच्या भूखंडांशी संबंधित नियम आणखी सुटसुटीत करण्यात आले आहेत. गोवा औद्योगिक विकास महामंडळाने राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील औद्योगिक भूखंडांचे वाटप, उप-लीज आणि हस्तांतरणासाठी सुटसुटीत नियम अधिसूचित केले आहेत. नवीन नियमानुसार व्यवसाय सुलभतेसाठी अनेक उपाय लागू केले आहेत. राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीन नियमांमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये व्यावसायिक आणि किरकोळ दुकानेही सुरू करता येणार आहेत.