दक्षिणेत 17 डिसेंबरला खंडित वीजपुरवठा

0
9

दक्षिण गोव्यातील बहुतांश भागात रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित असेल, असे वीज खात्याने काल एका नोटिसीद्वारे कळवले आहे. सदर दिवशी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील प्रमुख भाग व राय, कुडतरी, लोटली व माकाझान सोडल्यास उर्वरित दक्षिण गोव्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असेल. या दिवशी संपूर्ण सासष्टी तालुका, काणकोण, सांगे, केपे, मुरगाव, तसेच धारबांदोडा तालुक्यातील कीर्लपाल-दाभाळ पंचायत, शिगाव-कुळे पंचायत, मोले, तसेच फोंडा तालुक्यातील पंचवाडी पंचायत आणि दक्षिण गोव्यातील सर्व औद्योगिक वसाहती, साळावली पाणीपुरवठा यंत्रणा आदी ठिकाणी वीजपुरवठा खंडित असेल.