जलक्रीडा धोरण तयार करणार : पर्यटनमंत्री

0
23

राज्यातील जलक्रीडा व्यवसाय हे पूर्णपणे बेकायदेशीररित्या चालत असून, हे व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्ती सरकार दरबारी नोंदणी देखील करत नाहीत. त्यामुळे पर्यटन खात्याने आता जलक्रीडा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यानी विधानसभेत दिली. काल शून्यप्रहराला दाजी साळकर यांनी राज्यातील जलक्रीडा व्यवसायांचा विषय विधानसभेत मांडला होता. या जलक्रीडांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे बोटी बुडण्यासारख्या घटना राज्यात घडत असल्याची बाब दाजी साळकर यांनी काल सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावर उत्तर देताना रोहन खंवटे हे म्हणाले की, जलक्रीडा हे बंदर कप्तान खात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे पर्यटन खात्याला काहीही करता येत नाही; मात्र आता पर्यटन खाते जलक्रीडा धोरण तयार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.