काल हळदोणा मार्केटमध्ये घडलेल्या दहशतीच्या वातावरणाप्रकरणी भाजपाचे उमेदवार ग्लेन टिकलो यांच्या तक्रारीनुसार म्हापसा पोलिसांनी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. दयानंद नार्वेकर यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव करणे, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणे, अपमान, शिविगाळ करून जिवंत मारण्याची धमकी देणे असा भारतीय दंड संहितेच्या कलमा नुसार गुन्हा नोंद केला आहे.
टिकलो यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे निवडणूक भरारी पथकाच्या अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार काल दि. २ रोजी म्हापसा पोलिसांनी कॉंग्रेसचे उमेदवार दयानंद नार्वेकर, श्री. कार्देरो, निखिल चोडणकर, सतीश गोवेकर, सदानंद राऊळ, जेम्स कुमलो, निकोलस डायस, दिलीप हळदणकर, श्याम साटेलकर, रामा साटेलकर, थॉमस लोबो, मेरीयन डिसोझा, मेरी कोरेरो यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.