तिसवाडी–सांत आंद्रे मतदारसंघाचे भाजप–मगो युतीचे उमेदवार विष्णू सूर्या वाघ यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या मतदारसंघाचा झंझावती दौरा केला.
या एक दिवशीय दौर्यात श्री. पर्रीकर यांनी मतदारसंघातील अनेक लहान मोठ्या गावांना भेटी देऊन तेथील वातावरण जाणून घेतले. अनेक मतदारांशी संपर्क साधत विष्णू वाघ यानांच निवडून देण्याचे आवाहन केले तर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीत कशा पद्धतीने काम करावे जेणे करून श्री. वाघ यांचा विजय सुकर होईल याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी आयोजित कोपरा बैठकीत त्यानी भाजपच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे स्पष्ट करून गोव्याच्या भवितव्यासाठी भाजप–मगो युतीचे सरकार सत्तेवर येणे का गरजेचे आहे पटवून दिले. यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार विष्णू वाघ व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.