>> भरधाव वेगाने येणार्या कारने दिली धडक
वेर्णा आग्नेल आश्रम येथे एका कारने एका दुचाकीस्वाराला ठोकरल्याने दुचाकीचालक सां जुझे द आरीयल येथील आकाश गावडा (२७) याचा मृत्यू झाला.
या अपघाताबाबत वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भरधाव वेगाने नुवे ते जुने म्हार्दोळ वेर्णाच्या दिशेने जाणार्या मारुती सुझुकी स्विफ्ट या काळ्या पिवळ्या (जीए ०८ व्ही ०३१६) या कारने वेर्णा माटोल येथे टीव्हीएसच्या दुचाकीला (जीए ०८ एआर ७४६१) धडक दिली. ही दुचाकी कुठ्ठाळीहून जात होती. यावेळी बेदरकार आणि निष्काळजीपणे जाणार्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक आकाश हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी टॅक्सी चालक दामोदर नाईक काणकोण याला, वेर्णा पोलिसांनी अटक केली आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रेसियस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.