गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मडगाव येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचा विरोध असतानाही नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करण्यात आल्यानंतर सरदेसाई आणि पालेकर यांची भेट चर्चेचा विषय बनली आहे. भाजपकडून विरोधी पक्षांना धोका संभवतो. भाजपकडून लोकशाहीविरोधी कृत्ये करून विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी चिंता सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केली. लोकशाहीच्या संवर्धनासाठी योग्य पाऊल उचलणे अपरिहार्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.