चौघेजण ताब्यात

0
8

>> तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये एनआयएचे ४० जागी छापे

राष्ट्रीय तपास संस्थेन (एनआयए) काल रविवारी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ४० ठिकाणी छापे टाकून चार जणांना ताब्यात घेतले. दहशतवादविरोधी तपास यंत्रणेने तेलंगणात ३८ आणि आंध्र प्रदेशात दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, दोन खंजीर आणि ८.३१ लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तेलंगणातील निजामाबाद पोलीस ठाण्यात सुरुवातीला ४ जुलै रोजी पीएफआयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि चार आरोपी अब्दुल कादर, शेख सहदुल्ला, मोहम्मद इम्रान आणि मोहम्मद अब्दुल मोबीन यांना राज्य पोलिसांनी अटक केली. हे आरोपी कथितरित्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करत होते. भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला बाधा आणणार्‍या कारवायांमध्ये गुंतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

पीएफआयच्या सदस्यांनी कराटे वर्गाच्या नावाखाली तरुणांसाठी प्रशिक्षण आणि शारीरिक व्यायाम सुरू केले आणि त्यांना आपली द्वेषपूर्ण भाषणांद्वारे एका विशिष्ट समुदायाविरोधात भडकावले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.