Home बातम्या मनीष सिसोदियांविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा

मनीष सिसोदियांविरुद्ध मनी लॉंड्रिंगचा गुन्हा

0

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने ईडीकड महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्यानंतर ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली होती. त्यामुळे सिसोदिया यांच्याविरोधात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे.