भाजपच्या ‘त्या’ दाव्याच राव यांच्याकडून इन्कार

0
12

कॉंग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी केलेल्या दाव्याचा कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल इन्कार केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवी यांनी विरोधी गटातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर बोलताना राव यांनी कॉंग्रेसचे आमदार एकसंध असून, भाजप विरोधी पक्षांत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला. राज्यातील पंचायतींच्या निवडणुका वेळेवर घेण्याची गरज आहे. भाजप सरकारकडून पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही राव यांनी केला. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या उदयपूर येथे झालेल्या संकल्प चेतना शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे आमदार, नेते, प्रमुख कार्यकर्ते यांची एक बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत संकल्प चेतना शिबिरातील राज्यात अंमलबजावणीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.