सोनियांसह राहुल गांधींना ईडीची नोटीस

0
15

>> नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ८ जूनला होणार चौकशी

सक्तवसुली संचलनालया (ईडी)ने कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणाची फाईल सक्तवसुली संचलनालयाने २०१५ मध्ये बंद केली होती; मात्र आता ईडीने नोटीस पाठवली आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती कॉंग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन काल दिली.

८ जूनला सोनिया गांधी चौकशीला उपस्थित राहतील. मात्र राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ८ तारखेपर्यंत ते मायदेशी परतल्यास ईडीच्या कार्यालयात जातील; अन्यथा ईडीकडून अधिक वेळ मागण्यात येईल, असे सिंघवी म्हणाले.