राज्यात येत्या २० एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता येथील हवामान विभागाने काल वर्तविली आहे. येत्या २० ते २२ एप्रिल दरम्यान तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २१ एप्रिलच्या दरम्यान काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.