राज्यात कोरोनाचे १७ सक्रिय रुग्ण

0
24

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन २ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र आणखी कोरोना बळींची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या १७ एवढी आहे. राज्यातील गेल्या चोवीस तासांत नवीन ४२३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २ स्वॅबचा नमुना बाधित आढळून आला. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत ४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४३ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत कुणालाही इस्पितळात दाखल करण्यात आले नाही.