भाजपचा ६ एप्रिलला हा स्थापना दिन असून, यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी १० वाजता भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजप नेते अरुण सिंह यांनी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. देशातील भाजपच्या सर्व शाखेच्या कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येईल. या कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, आमदार सहभागी होणार आहेत. तसेच ७ ते २० एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.