चोवीस तासांत ९५ कोरोनाबाधित

0
28

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले ९५ रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झाला नाही. तर ९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ६९९ झाली आहे. काल चोवीस तासांत ५०७२ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२८९ एवढी आहे.

कोविड पॉझिटिव्हिटी दर वाढून १.८७ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून ५ जणांना डिस्चार्ज दिला तर १२ जणांना इस्पितळांत भरती करण्यात आले.