कुंभारजुवेत सांगडोत्सव उत्साहात

0
90

कुंभारजुवे नदीत काल सात दिवशीय गणेश मूतींच्या विसर्जनानिमित्त सांगडोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमावलीनुसार हा उत्सव साजरा झाला.

सांगडोत्सवात काल शंतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानात पुजण्यात आलेला गणपतीचा सांगोड प्रथम मार्गस्थ झाला. यात वेताळ, शंकासूर, रिद्धी-सिद्धी यांचे पुतळे होते. त्याच्यामागोमाग देखाव्यांचे सांगोड मार्गस्थ झाले. रात्री ८.३० वा. सांगडोत्सवास सुरूवात झाली. सात फेरे काढल्यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते.