>> कोरोना पॉझिटिव्हिटी १.४ टक्के
राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले ९६ नवे रुग्ण सापडले आहेत. नव्याने केलेल्या ६७५७ जणांच्या स्वॅब चाचण्यांत ९६ जणांना कोरोचा ससर्स्ग झाल्याचे आढळून आले आहे. राज्यात कोरोनाचा संसग होण्याचा दर हा आता १.४ टक्के एवढा घसरला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तसेच चोवीस तासांत ७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ९१३ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२०२ एवढी आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या १० एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १४ एवढी आहे. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ८२ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण पणजी येथे असून त्यांची संख्या ७३ झाली आहे. त्या खालोखाल मडगाव ५८, काणकोण ५३, शिवोली ४९, पर्वरी ४२, कासावली ४२, चिंबल ३३, म्हापसा ३३, कांदोळी ३०, कुठ्ठाळी ३०, नावेली ३२, फोंडा २५ अशी रुग्णसंख्या आहे. तर मयेमध्ये २ रुग्ण सापडले आहेत.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७०,०३१ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७४,१४६ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२,२०,६८३ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२१,५७४ एवजडी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,०९५ एवढी आहे.