धारगळीत १०० एकरमध्ये होणार करमणूक सिटी

0
51

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने बुधवारी मंजुरी दिलेल्या सीएमएम लॉजिस्टिक पार्क व करमणूक सिटी हा प्रकल्प डेल्टा कॉर्प ह्या कंपनीतर्फे धारगळ येथे उभारण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पात कॅसिनो, वॉटर पार्क, रिसोर्ट, तसेच मल्टिप्लेक्स आदींचा समावेश असेल.

डेल्टा कॉर्पतर्फे उभारण्यात येणारा हा प्रकल्प आतापर्यंतच्या गोव्यातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असून तो तब्बल १०० एकर एवढ्या जागेत उभा राहणार आहे. मोप विमानतळापासून तो अवघ्याच किमी अंतरावर असेल. गोव्यातील एक लाईन प्रोड्युसर असलेल्या संदीप कोटेचा यांनी या प्रकल्पाचे स्वागत केलेले असून या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे त्यांनी आभार मानले आहेत.