अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर दि. १६ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास ७३० जणांना भारतात सुखरूप आणण्यात आले आहे. तरीही अद्याप २०० ते ३०० नागरिक अफगाणिस्तानात अडकले आहेत. या सर्वांना लवकरात लवकर भारतात आणण्यात येणार आहे. काल मंगळवारी ७८ जणांना घेऊन काबूलहून एक विमान निघाले असून त्यात २५ भारतीय आहेत. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. तसेच अमेरिकेने आतापर्यंत १०,९०० जणांची सुटका केली आहे.