दिल्लीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी

0
89

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल दिल्ली पोलिसांना आला. त्यानंतर विमानतळ परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली. दिल्लीतील विमानतळ उडवून देण्याच्या तयारीत अल-कायदा ही संघटना असल्याचा ईमेल आल्यावर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र या ईमेलचा तपास करत असताना असाच ईमेल यापूर्वीदेखील पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.