चोवीस तासांत राज्यात कोरोनाने १ मृत्यू

0
68

राज्यात काल रविवारी ८७ जण कोरोनामुक्त झाले तसेच ६९ बाधित सापडल्याने सक्रिय रुग्णसंख्या ९८७ झाली आहे. तसेच काल राज्यात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१६० झाली आहे.

काल राज्यातील ४८६७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेली एकूण रुग्णसंख्या १,७१,८८३ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के आहे. रविवारी ८७ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.