राज्यात नवे ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११३७ एवढी झाली आहे, तर एकूण बळींची संख्या ३१३६ एवढी झाली आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.५४ टक्के एवढे आहे.
राज्यात नवे रुग्ण आणि बळी यांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. या महिन्यात आत्तापर्यंत अनेक वेळा शून्य बळींची नोंद झालेली आहे. राज्यात शनिवारी शून्य बळीची नोंद झाली होती, तर रविवारी ६ बळींची नोंद झाली होती.
गेल्या २४ तासांत इस्पितळातून १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७० हजार ५८१ एवढी झाली आहे. आणखी १२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत ३४४८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आणखी ५८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
आणखी १०७ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ३०८ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५० टक्के एवढे आहे.