येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

0
41

बी. एस. येडियुरप्पा यांनी काल कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सोमवारी दुपारी त्यांनी राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.

२०१९ मध्ये येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. येडियुरप्पा यांचा २ वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भाजप सरकारच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गृहमंत्री बसवराज बोम्मई, विश्वेश्वरा हेगडे कगेरी, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नावे चर्चेत आहेत.