>> शुक्रवारी ४ बळी, १२० बाधित
राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे १२० रुग्ण आढळून आले असून ४ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १६५९ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३१०६ एवढी आहे. राज्यातील नवीन रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. हे प्रमाण आणखी कमी होण्याची गरज आहे.
राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळींमध्ये चढउतार सुरू आहे. काल शुक्रवारी गोमेकॉमध्ये तीन रुग्ण आणि दक्षिण गोवा इस्पितळात एका रुग्णाचा बळी गेला. सांगोल्डा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले. वाळपई येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्ण, करासवाडा येथील ७५ वर्षीय महिला रुग्ण आणि केपे येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले.
नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.७१ टक्के टक्के एवढे आहे. इस्पितळातून १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार ४६१ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत ४४३० स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.