आपच्या वीज सवलतीवर काब्राल यांची टीका

0
124

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत वीज प्रश्‍नावर चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या वीज सवलतीवर वीजमंत्री काब्राल यांनी टीका केली. मुख्यमंत्री केजरीवाल जेव्हा गोव्यामध्ये असतील तेव्हा मी चर्चेसाठी तयार आहे. गोव्यात त्यांनी जाहीर केलेली वीज योजना फक्त दिल्लीतील लोकांसाठी आहे. ज्या दिल्लीकरांचे दुसरे घर गोव्यात आहे. त्यांच्यासाठी या योजना आहेत. गोव्यातील लोकांसाठी ही योजना व्यावहारिक नाही, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले. दिल्ली ऊर्जा विभागाच्या त्यांच्या मुक्त युनिट योजनेमुळे वीज निर्मिती कंपनीवर २ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, असा दावा वीजमंत्री काब्राल यांनी केला.