युजीसीच्या अभ्यासक्रमातून मुघल आक्रमकांना वगळले

0
89

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमात अकबर आणि मुघलांपेक्षा महाराणा राणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहे.
इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा युजीसीने तयार केला आहे. यामध्ये भारतावर आक्रमणे करणार्‍या आणि येथील अनेक वास्तू उद्धवस्त करणार्‍या मुस्लीम आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे.

‘हिस्ट्री ऑफ इंडिया (इसवी सन १२०६ ते १७०७)’ अंतर्गत सांगण्यात येणार्‍या इतिहासामध्ये आता अकबर आणि मुघलांऐवजी राणा प्रताप आणि राजा विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे.

हा नवा अभ्यासक्रम वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित असेल. या माध्यमातून पदवीपूर्वी विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची शक्यता आहे.