नवीन केंद्रीय मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

0
112

बुदवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल गुरूवारी बहुतेक सर्व नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या सर्वांना सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचे काम समजून घ्या असे सांगितले आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मोदींनी मंत्रालयाचे कामकाज लवकर सुरी करण्यास सांगितले असून प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असाही सल्ला मोदींनी दिला आहे.

नव्या मंत्रिमंडळात आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदींचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण आहे. सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२ मंत्र्यांना वगळण्यात आले असले तरी, संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र खात्यांच्या प्रमुख चार मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बुधवारी शपथ घेतलेल्या ४३ पैकी ३६ मंत्र्यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.