नवीन राज्यपाल पिल्लई पुढील आठवड्यात गोव्यात

0
98

गोव्याचे नवीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई येत्या जुलै महिन्याच्या मध्यास गोव्यात दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. राष्ट्रपती भवनातून गोवा राज्यासाठी पूर्णवेळ राज्यपालांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. येत्या १५ ते १६ जुलै दरम्यान गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.