जेईई-मेन परीक्षेच्या दोन्ही सत्रांच्या तारखेची घोषणा

0
90

जेईई-मेन परीक्षेच्या तिसर्‍या आणि चौथ्या सत्रांची तारीख काल जाहीर करण्यात आली असून तिसरे सत्र २० ते २५ जुलै दरम्यान तर चौथे सत्र २७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी काल ही घोषणा केली. यंदा कोरोनामुळे जी मेन ही परीक्षा चार सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. पहिली परीक्षा फ्रेब्रुवारीमध्ये झाली. दुसरी मार्चमध्ये घेण्यात आली. आता केंद्र सरकारने तिसर्‍या आणि चौथ्या सत्रांसाठी परीक्षांची तारीख जाहीर केली आहे.