आसाममधील सात जिल्ह्यांत आजपासून लॉकडाऊन जाहीर

0
50

आसाममध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्य सरकारने सात जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज दि. ७ जुलैपासून ही टाळेबंदी घोषित करण्यात आली असून ती पुढचा आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे. आसाममध्ये सोमवारी २६४० नवीन कोरोना संक्रमित रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ५ लाख १९ हजार ८३४ वर पोहोचली. तर गेल्या २४ तासांत ३१ मृत्यू नोंदविण्यात आल्यानंतर एकूण मृतांची संख्या ४६८३ एवढी झाली आहे. राज्यात सध्या २२ हजार २४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ४ लाख ९१ हजार ५६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ७६.८५ लाखांहून अधिकजणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यात १३.०९ लाख जणांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.