२१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात अनलॉक प्रक्रिया

0
100

देशातल्या २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. मात्र काही प्रमाणात लॉकडाऊनसारखे निर्बंधदेखील आहे. यात केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू- काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. तसेच देशातल्या १० राज्यांमध्ये अजूनही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, मिझोराम, गोवा आणि पुदुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्यात आले आहेत.