ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक लँबर्ट मास्करेन्हस यांचे निधन

0
112

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, पद्मश्री लॅँबर्ट मास्करेन्हस यांचे १०६ व्या वर्षी दोनापावल येथे निवासस्थानी काल निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. गोवा श्रमिक पत्रकार संघाने मास्करेन्हस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मास्करेन्हस यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले. राममनोहर लोहिया यांनी १९४६ साली पोर्तुगिजांविरुद्ध सुरू केलेल्या चळवळीचा त्यांनी परामर्श घेतला. वर्ष २०१५ साली मास्करेन्हस यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. तर गोवा सरकारने गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मास्करेन्हस यांनी पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिले आहे. पत्रकारितेमध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांना पत्रकारितेसाठी दिवंगत लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी इंग्रजी भाषेतून अनेक पुस्तकांचे लेखन केले.

धक्कादायक ः श्रीपाद नाईक
स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार लँबर्ट मास्करेन्हस यांच्या निधनाचे वृत्त मोठे धक्कादायक व दु:खदायक असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.