Home बातम्या २४ तासांत देशभरात सव्वातीन लाख कोरोनामुक्त

२४ तासांत देशभरात सव्वातीन लाख कोरोनामुक्त

0

देशात करोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांपेक्षाही कमी कोरोनाबाधित आढळले. त्याचप्रमाणे तब्बल ३ लाख २६ हजार ८५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी दि. २४ मे रोजी १ लाख ९६ हजार ४२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. याचसोबत, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६९ लाख ४८ हजार ८७४ झाली आहे. देशात सध्या २५ लाख ८६ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी १४ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांहून कमी होती. तसेच कोरोना मृत्यूतही थोडी घट झली असून गेल्या २४ तासांत करोनामुळे ३५११ जण मृत्युमुखी पडले.