जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनला जुलैनंतर मान्यता

0
122

>> भारत बायोटेकची माहिती

कोरोनावरील भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीला जागतिक आरोग्य संघटनेकडून येत्या जुलै ते सप्टेंबरदरम्यान आपत्कालीन मंजुरी मिळू शकते असे भारत बायोटेकने म्हटले आहे. जवळपास ६० देशांमध्ये कोव्हॅक्सिन लशीला मंजुरी मिळण्यासाठी नियामक संस्थांकडून प्रक्रिया सुरू आहे.

कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन मंजुरीसाठी जिनेव्हात डब्ल्यूएचओकडे अर्ज करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिन लशीला आतापर्यंत १३ देशांनी मंजुरी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आपत्कालीन वापराच्या लशींच्या यादीत समावेश केलेला नाही. या यादीत समावेश करण्यासाठी भारत बायोटेककडून आणखी काही माहितीची आवश्यकता असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन लशींत समावेशासाठी ९० टक्के दस्ताऐवज संघटनेकडे सुपूर्द केले आहेत. उर्वरित दस्ताऐवज जूनपर्यंत दिले जातील, असे भारत बायोटेकने म्हटले आहे.