Home Featured कोरोनाने शुक्रवारी ३० जणांचा बळी

कोरोनाने शुक्रवारी ३० जणांचा बळी

0

>> चोवीस तासांत नवे १६२५ रुग्ण, ३०७५ कोरोनामुक्त

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३० रुग्णांचा बळी गेला असून नव्या १६२५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३०७५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २,३०२ एवढी झाली आहे.

सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ३२८ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३२.१० टक्के एवढे झाले आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून १८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवे १६२५ रुग्ण
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण थोडे कमी होत आहे. पॉझिटिव्हीटी दर ३२.१० टक्क्यांवर आला आहे. चोवीस तासांत नवे १६२५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ५०६३ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार १९२ एवढी झाली आहे.

मडगाव, पणजी, चिंबल, कांदोळी, फोंडा, पर्वरी, कासावली, कुठ्ठाळी या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मडगाव येथील रूग्णसंख्या १८२९ एवढी झाली आहे. पणजीमध्ये ११३३ रुग्ण, चिंबल येथे १०६४ रुग्ण, फोंडा येथे १०३२ रुग्ण, कांदोळी येथे ९२१ रुग्ण, कुठ्ठाळी येथे ८४६ रुग्ण, कासावली येथे ८७६ रुग्ण, वास्को येथे ७१५ रुग्ण, पर्वरी येथे ८१३ रुग्ण आहेत.

२४ तासांत २०७ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या २०७ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्या जास्त आहे. आत्तापर्यंत २५ हजार १११ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले आहेत.

३०७५ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना बाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित आणखी ३०७५ रुग्ण काल बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ होत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ५६२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.८९ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १४३८ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.

चोवीस तासांत ३० मृत्यू
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. चोवीस तासांत ३० रुग्णांचा बळी गेला आहे. मडगावच्या दक्षिण गोवा इस्पितळात ११, बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ९, उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात ४ रुग्ण, दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात ४ रुग्ण, ईएसआय आणि कुडतरी येथे प्रत्येकी १ बळीची नोंद झाली आहे. ३ कोरोना रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता.