Home बातम्या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात जुन्या आश्‍वासनांचीच पुनरावृत्ती

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात जुन्या आश्‍वासनांचीच पुनरावृत्ती

0

श्रीपाद नाईक यांची टीका

कॉंग्रेस पक्षाने २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकांपुढे जो जाहीरना’ा ठेवला होता, तोच आता प्रसिद्ध केला असल्याची टीका उत्तर गोव्याचे खासदार व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

कॉंग्रेसने २००७ सालच्या जाहीरनाम्यात जी विकासका’े करणार असल्याचे सांगितले होते, त्यापैकी जवळ-जवळ ६० ते ७० टक्के विकासका’ांचा त्यांच्या या वेळच्या जाहीरनाम्यात स’ावेश केला असल्याचे सांगून यावरून गेल्या ५ वर्षांत त्यांनी काहीही विकासका’े केली नसल्याचे सिद्ध होत असल्याचे नाईक यांनी सांगितले. जाहीरनाम्यातून आम्ही दारिद्य्ररेषेखालील लोकांना गृहकर ’ाफ करणार, तसेच पेट्रोल ११ रु. नी स्वस्त करणार असे जे म्हटले आहे, त्याला शांताराम नाईक यांनी आक्षेप घेऊन आम्ही पैसे कोठून आणणार असा सवाल केलेला आहे, असे सांगून ते म्हणाले की, कॉंग्रेसचे मंत्री सरकारी तिजोरीतील पैसे लुटतात म्हणून त्याना विकासकामे करण्यासाठी निधी पुरत नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर विकासकामे कशी करायची ती त्यांना करून दाखवू.

दयानंद सुरक्षा योजनेखाली लोकांना जे मासिक १ रु. रुपये मिळतात ते २ हजार रु. करू असे आम्ही जाहीरनाम्यातून स्पष्ट केल्यानंतर कॉंग्रेसने आपण २५०० रु. देणार असल्याचे स्पष्ट केल्याचे सांगून कॉंग्रेसने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा असा लिलाव करू नये. या योजनेखालील पैसै वाढवण्याचा ठराव भाजपने विधानसभेत आणला होता. पण कॉंग्रेसने त्याला विरोध केल्याचे ते म्हणाले.

अनुसूचित जमातीना गोवा विधानसभेत आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कॉंग्रेसने जाहीरनाम्यातून दिलेले आश्‍वासन हे पोकळ असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. अनुसूचित जमातीतील लोक गेल्या ५ वर्षांपासून या आरक्षणासाठी लढत आहेत. मात्र, कॉंग्रेस त्यांची मागणी पूर्ण करीत नसल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जमातींना पूर्वी ओबीसीमध्येच आरक्षण होते. वाजपेयी हे प्रधानमंत्री असताना त्यांनी त्यांच्यासाठी वेगळ्या आरक्षणाची सोय केल्याचे नाईक म्हणाले. १२ पूल बांधण्याची घोषणा जाहीरनाम्यातून करणार्‍या कॉंग्रेसने गेल्या ५ वर्षांत राज्यात एकही पूल बांधला नसल्याचे नाईक यांनी नजरेत आणून दिले. राज्यातील बेकायदा खाणी बंद करणार असल्याचे कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून स्पष्ट केल्याचे सांगून आतापर्यंत या बेकायदा खाणी का चालू ठेवण्यास दिल्या त्याचे उत्तर अगोदर कॉंग्रेसने द्यावे, अशी मागणी यावेळी श्रीपाद नाईक यांनी केली.

यावेळी बोलताना डॉ. विल्फ्रेड मिस्किता म्हणाले की, एकाच कुटुंबातील जास्त लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली नाही, असे ऑस्कर फर्नांडिस हे म्हणतात याचा अर्थ पुढच्या वेळी एकाच कुटुंबातील त्याच्यापेक्षा जास्त लोकांना ते उमेदवारी देणार आहे काय, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे ते पुढे म्हणाले.