>> वाहतूक खात्यातर्फे आदेश जारी
राज्यातील टुरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला आज दि. २० मे २०२१ पासून प्रारंभ केला जाणार आहे. वाहतूक खात्याने यासंबंधीचा एक आदेश जारी केला आहे. राज्यात ४ ठिकाणी डिजिटल मीटर बसविण्याची सोय करण्यात आली आहे. वाहतूक खात्याकडून मीटर न बसविणार्या टुरिस्ट टॅक्सींचा परवाना रद्द करणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
न्यायालयाने १५ दिवसांत मीटर बसविण्याचा प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश ६ मे २०२१ रोजी दिला आहे. त्यानुसार ा मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणारा आदेश जारी केला आहे.
टुरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याबाबतचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार मीटर न बसविल्यास टॅक्सीचा परवाना रद्द होईल. मीटर बसविल्यानंतर वाहन मालकाने आपली टॅक्सी वजन आणि माप खात्याच्या कार्यालयात नेऊन त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेतले पाहिजे, असेही आदेशात नमूद केले आहे.