Home Featured केंद्र सरकारकडून गोव्याला २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारकडून गोव्याला २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स ः मुख्यमंत्री

0

केंद्र सरकारने गोवा राज्याला २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांना प्राणवायू पुरवठ्याची सोय उपलब्ध करण्यासाठी जादा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची गरज आहे. राज्य सरकारने खासगी आस्थापनांकडून सीएसआर अंतर्गत ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

आयएएफच्या एअरक्रॉफ्टने प्राणवायू दाबोळी विमानतळावर आणण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारने २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स उपलब्ध केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील तालुका पातळीवरील इस्पितळाला भेट देऊन तेथील उपलब्ध करण्यात आलेल्या साधनसुविधांची पाहणी केली.

तसेच, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बांबोळी येथील सुपरस्पेशालिटी ब्लॉकला भेट देऊन तेथील वैद्यकीय साधनसुविधांच्या कामाचा आढावा घेतला.
ताळगाव येथील तालुका इस्पितळात गंभीर आजारी नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

कोविड १९ मध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या डॉक्टर, नर्स, हाउस स्क्रिपिंग कर्मचारी म्हणून काम करणार्‍यांना सरकारी सेवेत प्राधान्य दिले जाणार आहे. खासगी इस्पितळात काम करणार्‍यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.